Rare 1968 short film on Dr. Babasaheb Ambedkar

Ambedkar

A rare short film made on Dr. Babasaheb Ambedkar in 1968 has been acquired by National Film Archive of India. The film in Marathi titled ‘Mahapurush Dr. Ambedkar’ was produced by the Director of Publicity, Government of Maharashtra in July 1968. Directed by Namdeo Vatkar under the banner of Vathkar Productions, the music for the 18 minute short film was composed by renowned composer Datta Davajekar. Veteran film artist David Abraham was the narrator for the film. Namdeo Vatkar was a veteran actor and director in Marathi film industry who wrote and directed films like Aaher featuring Sulochana in 1957 and Mulga featuring Hansa Wadkar in 1956. He also wrote the story of Ram Gabale film Ghardhani along with P.L.Deshpande in 1952.

“It is a very timely discovery of the film on Dr. B.R. Ambedkar when we are celebrating 130th birth anniversary of the key architect of the Indian Constitution on 14th April. The short film fictionalises the key events of Dr. Ambedkar’s life and it also has live footage of his later years,” said Prakash Magdum, Director, NFAI. The film has the visuals of Dr. Ambedkar embracing the Buddhist religion and his visit to Nepal along with close-up shots of his funeral procession at Dadar Chowpaty in Mumbai. Madhukar Khamkar did the cinematography while G.G. Patil edited the film.

“The film was originally made in 35 mm format but what we have found is a 16 mm copy probably meant for distribution in rural areas. The condition of the film is moderate and we plan to digitise it soon so that it can be accessed by people,” said Prakash Magdum. He added, “We appeal to individual collectors and distributors along with others to come forward and submit films or footages at NFAI so that it can be preserved.

 


 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर १९६८ साली तयार करण्यात आलेल्या दुर्मिळ लघुपटाची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात नुकतीच भर पडली आहे. ” महापुरुष डॉ. आंबेडकर ” या नावाने तयार करण्यात आलेल्या या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे १९६८ च्या जुलै महिन्यात करण्यात आली होती. ‘व्हटकर प्रौडक्शन्स’ या बॅनरखाली निर्मित करण्यात आलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. सुमारे १८ मिनिटांच्या या लघुपटाला सुप्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते तर सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी या लघुपटाचे निवेदन केले होते.

श्री नामदेव व्हटकर हे एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. १९५७ साली अभिनेत्री सुलोचना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आहेर’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. तसेच १९५६ साली प्रदर्शित झालेल्या आणि हंसा वाडकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मुलगा’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन व्हटकर यांनी केले होते. याशिवाय  १९५२ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाले यांच्या ‘घरधनी’ या चित्रपटाचे कथालेखन त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासमवेत केले होते.

”भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उद्या १४ एप्रिल रोजी देशात सर्वत्र उत्साहाने साजरी केली जात असतानाच डॉ. आंबेडकर यांच्यावरील हा दुर्मिळ लघुपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त होणे हा एक अपूर्व योगायोग आहे असे सांगून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले की, या दुर्मिळ लघुपटात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे तसेच त्यांच्या अखेरच्या काळातील काही घटनांचे ‘फुटेज’ पाहायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे स्वीकारललेला बुद्ध धर्म तसेच  त्यांनी केलेला नेपाळ दौरा, याशिवाय मुंबई येथील दादर चौपाटी येथे आंबडेकर यांच्या निघालेल्या अंत्ययात्रेचे ठळक चित्रीकरण या लघुपटात पाहायला मिळते. या लघुपटाचे छायाचित्रण मधुकर खामकर यांनी केले असून जी. जी. पाटील यांनी संकलन केले आहे.

”वास्तविक हा लघुपट मुळात ३५ एमएम च्या स्वरूपात होता परंतु त्याची १६ एमएम स्वरूपातील प्रिंट आम्हाला मिळाली आहे असे सांगताना  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले की, कदाचित ग्रामीण भागात वितरण करण्याच्या हेतूने १६ एमएम च्या प्रिंट्स काढण्यात आल्या असाव्यात. या प्रिंटची सध्याची अवस्था ही मध्यम स्वरूपातील असून त्याचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येईल जेणे करून ती अधिकाधिक प्रेक्षकांना पाहता येऊ शकेल अशीही माहिती मगदूम यांनी दिली.  ज्या वितरकांकडे तसेच वैयक्तिक संग्रह करणाऱ्यांकडे अशा स्वरूपाच्या दुर्मिळ फिल्म्स अथवा चित्रपटविषयक साहित्य असेल ते त्यांनी कायमचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

 

Categories
National Film Archive of India

The information here is from the Press releases received from the National Film Archive of India (NFAI), an organisation directly under the Ministry of Information and Broadcasting (I&B).

No comment
Site Archives

Related by

  • The world’s largest film restoration project under the National Film Heritage Mission (NFHM) with a budget of INR 363 crores has been announced by the Ministry. Additional to this process, NFHM...
  • Precious collection of films by Sumitra Bhave and Sunil Sukhthankar now with NFAI   मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि  सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांचा अनमोल खजिना राष्ट्रीय चित्रपट...
  • A substantial collection of home movies of renowned Manipuri dancer, Savita Ben Mehta is now part of the National Film Archive of India.  The collection is in 8mm and...
  • ” भारती यसिनेमाती लवेगवे गळ्या ‘प्रतिमांचावा परकरून दरवर्षी आगळ्यावेगळ्यादि नदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती कर ण्यातराष्ट्रीयचित्र पटसंग्रहालयने हमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपटसंग्र हालयाने यावर्षीही ( २०२२ ) अशाचएकावेगळ्या आणि आक र्षकदिनदर्शिके...