Personal collection of veteran actor-director Jaishankar Danve

Jaishankar Danve

A personal collection of actor-director Jaishankar Danve is now part of National Film Archive of India. His family handed over the valuable collection to Prakash Magdum, Director NFAI at their home in Kolhapur. A celebrated Marathi and Hindi artist, he was film/stage actor and acclaimed theatre director. Born in Pune, Jaishankar Danve started as a stage artist in Marathi and Urdu Theatre and then worked as an assistant director with Bhalji Pendharkar in Jayprabha Studios, Kolhapur in the 1930s. Danve worked in a significant number of films and plays during the illustrious career of more than five decades.

Some of his memorable films are Baburao Painter’s iconic social drama Savkari Pash (1936 ), Bhalji Pendharkar’s celebrated features Sasurvas (1946), Meeth Bhakar (1949), Mohityanchi Manjula (1963) and  Maratha Tituka Melavava (1964), and the main antagonist in Dada Konkde’s  Andhala Marto Dola (1973).  Interestingly, he made his film debut with Urdu film Asire Havis (1935), and played important parts in Hindi and Urdu cinema during the 30s and 40s in films like Sach Hai (1939), and shared the screen with legendary father-son duo Prithviraj Kapoor and Raj Kapoor in Valmiki (1946). Also, as a director, he made films such as Jai Bhawani (1947), Phoolpakhru (1953) and Ishwari Nyay (1953).

The collection consists of rare archival photographs and albums consisting of handbills, song booklets, newspaper clippings, articles, and old documents, various books, and also his handwritten plays. An interesting memorabilia of the collection is few wigs and a moustache from his 1933’s play Hamlet.

The major chunk of collection is a rare black and white photo frames and photographs from his films. There are 40 frames of 15*12 size showcasing different gestures from films and theatre, the album of 250 photos featuring clicks from his films and plays and 51 rare photos of other contemporary actors. In addition to this, there are three albums containing booklets, newspaper clippings, articles, rare handbills, old documents, and publicity material from the 1930s.

The highlight of the collection remains handwritten literary work by Jaishankar Danve which comprises fourteen novels, eight plays and five stories.

“We are delighted to receive this significant collection of an artist belonging to the early era of Indian Cinema. It is significant that the Danve family preserved his memories all these years and I thank them for this noble gesture of donating the collection to NFAI. The collection takes us back to the golden era of Marathi films and theatre though the rare photographs, documents, various handbills and other literary work. I am sure this addition would be useful to film researchers. I urge the families of veteran film artists to take inspiration from Danve family and donate such material for preservation”, said Prakash Magdum, Director, NFAI.

 


 

सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक कै. जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीयचित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. दानवे यांच्या कुटुंबीयांनी नुकताच कोल्हापूर येथे हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाशमगदूम यांच्याकडे सुपूर्द केला.  मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे जयशंकर दानवे हे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. पुण्यातजन्मलेले दानवे यांनी अगदी सुरुवातीला मराठी आणि उर्दू नाटकांमध्ये कामे केली आणि त्यानंतर १९३०च्या सुमारास कोल्हापूर येथे चित्रपटमहर्षी भालजीपेंढारकर यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. आपल्या पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत दानवे यांनी असंख्य मराठी  चित्रपट आणि नाटकांमधून  कामे केली.

सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांच्या ‘सावकारी पाश’ (१९३६) तसेच भालजी पेंढारकर यांच्या ‘सासुरवास ‘( १९४६), ‘मीठभाकर’ (१९४९), ‘मोहित्यांची मंजुळा ‘ (१९६३ ), ‘मराठा तितुका मेळवावा’ ( १९६४) आणि दादा कोंडके यांच्या ‘ आंधळा मारतो डोळा’ (१९७३) आदी चित्रपटांतील त्यांच्याभूमिका अविस्मरणीय ठरल्या होत्या. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘असिरे हवीश’ या उर्दू चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. १९३० आणि १९४० च्या दशकांत त्यांनी अनेक हिंदी आणि उर्दू चित्रपटांतून कामे केली. ‘सच हैं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. विशेष म्हणजेज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर या दोघांचीही भूमिका असलेल्या ‘वाल्मिकी’ ( १९४६) या चित्रपटातही दानवे यांनी काम केले होते.याशिवाय ‘जय भवानी’ ( १९४७ ), ‘फुलपाखरू’ ( १९५३ ), ‘ईश्वरी न्याय’ (१९५३) आदी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते.

दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहात असंख्य दुर्मिळ छायाचित्रे, हॅंडबिल्स, गाण्यांच्या पुस्तिका, वृत्तपत्रीय कात्रणे, त्यांच्यावर आलेले लेख, जुनीकागदपत्रे,

अनेक पुस्तके, त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेली काही नाटके तसेच ते काम करीत असलेल्या हॅम्लेट (१९३३) या नाटकातील काही विग्स, मिशा आदीवस्तूंचाही समावेश आहे. त्यांच्या संग्रहातील छायाचित्रे प्रामुख्याने कृष्णधवल असून सुमारे २५० छायाचित्रे दानवे यांनी अभिनित केलेल्या चित्रपट आणिनाटकांमधील आहेत. याशिवाय त्यांच्या समकालीन इतर अभिनेत्यांची ५१ छायाचित्रे आहेत. याशिवाय त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटआणि नाटकातील१५बाय १२ आकाराच्या सुमारे चाळीस मोठ्या फ्रेम्सही आहेत.

दानवे कुटुंबीयांनी मोठ्या परिश्रमाने जतन करून  ठेवलेला हा दुर्मिळ संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ‘युगा’ तील  एका ज्येष्ठ अभिनेता आणिदिग्दर्शकाचा हा संग्रह मिळाल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिना आणखी समृद्ध झाला असून त्याचा संशोधकांना खूप उपयोग होणार आहे, दानवे यांच्या कुटुंबीयांकडून प्रेरणा घेऊन इतरांनीही आपल्याकडील असाच दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करावा असे आवाहनही त्यांनीयावेळी केले.

 

Categories
National Film Archive of India

The information here is from the Press releases received from the National Film Archive of India (NFAI), an organisation directly under the Ministry of Information and Broadcasting (I&B).

No comment
Site Archives

Related by

  • The world’s largest film restoration project under the National Film Heritage Mission (NFHM) with a budget of INR 363 crores has been announced by the Ministry. Additional to this process, NFHM...
  • Precious collection of films by Sumitra Bhave and Sunil Sukhthankar now with NFAI   मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि  सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांचा अनमोल खजिना राष्ट्रीय चित्रपट...
  • A substantial collection of home movies of renowned Manipuri dancer, Savita Ben Mehta is now part of the National Film Archive of India.  The collection is in 8mm and...
  • ” भारती यसिनेमाती लवेगवे गळ्या ‘प्रतिमांचावा परकरून दरवर्षी आगळ्यावेगळ्यादि नदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती कर ण्यातराष्ट्रीयचित्र पटसंग्रहालयने हमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपटसंग्र हालयाने यावर्षीही ( २०२२ ) अशाचएकावेगळ्या आणि आक र्षकदिनदर्शिके...