Films by Sumitra Bhave and Sunil Sukthankar

Sumitra Bhave

Precious collection of films by Sumitra Bhave and Sunil Sukhthankar now with NFAI

 

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि  सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांचा अनमोल खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडेप्राप्त झाला आहे. श्री सुनील सुकथनकर आणि श्री चिन्मय दामले या दोघांनी  चित्रपटांचा हा अनमोल खजिना नुकताच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्रीप्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला आहे. समीक्षकांनीही गौरविलेल्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडगोळीने गेल्या अनेक वर्षांपासूनअनेक उत्तमोत्तम चित्रपट तयार केले असून या चित्रपटांना भारतात तसेच भारताबाहेरही बरेच गौरव -पुरस्कारही मिळाले आहेत. दुर्देवाने श्रीमती सुमित्रा भावे यांचेगेल्याचवर्षी दुःखद निधन झाले.

दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि  सुनील सुकथनकर या दोघांनी मिळून केलेल्या मराठी चित्रपटांमध्ये  गाजलेल्या शॉर्ट फिल्म्स, गाजलेले लघुपट, दूरचित्रवाणीवरील मालिका तसेच अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या संग्रहात सुमित्रा भावे यांनी केलेल्या पहिल्या ‘बाई’ या शॉर्ट फिल्म्सपासून तेअलीकडील ‘कासव’ ( २०१७ ) ते ‘दिठी’ ( २०१९ ) यासह असंख्य कलाकृतींचा समावेश आहे. उभयतांच्या यापैकी जवळपास प्रत्येक कलाकृतींना राष्ट्रीय आणिआंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.  त्यामध्ये प्रामुख्याने शॉर्ट फिल्म्सपैकी ‘पाणी’ ( १९८७ ), ‘मुक्ती’ ( १९९०), ‘चाकोरी’ ( १९९२) तसेच ‘दोघी’ ( १९९५), ‘दहावी फ’ (२००२ ), ‘वास्तुपुरुष’ (२००२), ‘देवराई’ (२००४) आणि ‘अस्तु’ (२००१४) या गाजलेल्या चित्रपटांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त झालेल्या या खजिन्यात ३५ मि. मी. प्रिंट्सच्या चित्रपटांमध्ये ‘दहावी फ’ ( २००२), ‘बाधा’ (२००४), ‘हा भारत माझा’ (२०१२), आणि ‘जिद्द’ (२००४) हि शॉर्ट फिल्म तसेच १६ एम एम प्रिंट्सच्या चित्रपटांमध्ये ‘जिंदगी जिंदाबाद’ (१९९७), आणि ‘बाई’ (१९८५), ‘पाणी’ (१९८७), ‘लाहा’ ( १९९४), या शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे. तसेच सुप्रसिद्ध निर्मात्या आणि फिल्म सोसायटी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्या विजया मुळे यांनी  तयार केलेल्या’किशन का उडन खटोला’ या १६ एम एम चित्रपटाचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे या संग्रहात ‘डिजिबेटा’, ‘बेटाकैम’, ‘युमॅटिक’, ‘ डीएलटी टेप्स’. ‘डीव्ही’, ‘मिनीडीव्ही’, आणि व्हीएचएस फॉरमॅट्स मधील विविध फिल्म्सकॅसेट्स आहेत.   ह्यातले महत्वाचे फिल्म्स म्हणजे सुप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जीवनावर आधारित ‘कर्ता’ हा लघुपट, ‘जिंदगी जिंदाबाद’ (१९९७), ‘देवराई’ (२००४). ‘एक कप चहा’ ( २००९) ‘मोर देखने जंगलमे’ ( २०१०),  हे चित्रपट, ‘मुक्ती’ ( १९९०), ‘चाकोरी’ ( १९९२), ‘लाहा’ ( १९९४), ‘जिद्द’ (२००४), ‘बेवक्त बारिश’ ( २००७), ‘ममता कि छाव में’, ‘एकलव्य’, ‘संवाद आणि सरशी’ या शॉर्ट फिल्म्स, तसेच ‘गौतमच्या आईची शाळा’ आणि ‘पिलिग्रॅम्स ऑफलाईट्स’  हे लघुपट आणि ‘कथा सरिता’, ‘अखेरची रात्र’, ‘भैंस बराबर’ या मालिकांचाही समावेश आहे.   याशिवाय शैक्षणिक भाषा उपक्रमांतर्गत तयार करण्यातआलेल्या ‘नातीगोती’, ‘हाऊ शल आय ऍड्रेस यू’, ‘अडगुलं मडगुलं’ या शॉर्ट फिल्म्सचंही समावेश आहे.

याप्रसंगी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाबाबत कृतज्ञता  व्यक्त करताना श्री सुनील सुकथनकर म्हणाले की, आमच्या चित्रपट प्रवासात राष्ट्रीय चित्रपटसंग्रहालय  हा नेहमीच एक महत्वाचा भाग राहिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडूनच आमचे चित्रपट जतन करून ठेवले जाणार आहेत  याचानिश्चितच आम्हाला आनंद वाटत आहे. आमच्या या सर्व चित्रपटांचे भावी पिढीसाठी डिजिटायझेशन केले जाईल अशी अपेक्षाही त्यांनी यावली व्यक्त केली.   दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि  सुनील सुकथनकर यांनी  २०१४-२०१५ साली देखील त्यांच्या ३५ एम एम लांबीचे काही चित्रपट  तसेच २०१८ साली  सुमित्रा भावेयांच्या ७५ व्या  वाढदिवसानिमित्त  त्यांच्या दहा चित्रपटांच्या हस्तलिखित पटकथा त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केल्या होत्या.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि  सुनीलसुकथनकर यांच्या चित्रपटांचे जतन करायला आम्हाला अगदी मनापासून आवडेल. वास्तविक यासंदर्भात माझे आणि सुमित्रा भावे यांच्याशी गेल्याच वर्षी बोलणेहीझाले झाले होते मात्र दुर्देवाने त्यांचे त्यानंतर लगेचच निधन झाले. सुमित्रा भावे यांनी आपल्या चित्रपटांमधून अनेक महत्वाचे  सामाजिक विषय   हाताळले होतेत्यामुळे त्यांचे चित्रपट म्हणजे एका युगाचा महत्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे भावी काळात विद्यार्थी, संशोधक तसेच चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यांना अतिशयचांगला उपयोग होऊ शकेल असेही श्री मगदूम यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी. चित्रपट-निर्माते आणि प्रौडक्शन हाऊसेस यांनी आपल्या सेल्युलॉइडफिल्मस जतन करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे द्याव्यात असे आवाहन देखील केले .

 


 

This collection is a major acquisition for the National Film Archive of India, by the celebrated filmmaker duo, Sumitra Bhave and Sunil Sukhthankar. Shri Sunil Sukthankar along with Chinmay Damle handed over the valuable collection to Prakash Magdum, Director NFAI. The critically acclaimed filmmaker duo Sumitra Bhave and Sunil Sukthankar have made a large number of films over the years that have won multiple awards and recognition both in India and abroad. Smt Sumitra Bhave passed away last year.

The duo significantly contributed to Marathi cinema with many noted short films, documentaries, TV shows and feature films. Be it Sumitra Bhave’s first short film Bai (1985) or the recent ones Kaasav (2017) and Dithee (2019), almost each and every film by the duo has won numerous national and international accolades. Their cherished filmography includes short films like Paani (1987), Mukti (1990), Chakori (1992), and highly admired films like Doghi (1995), Dahavi Fa (2002), Vastupurush (2002), Devrai (2004) and Astu (2016).

The collection received today consists of 35mm prints of feature films Dahavi Fa (2002), Badha (2006), Ha Bharat Majha (2012) and short film Zid (2004). 16mm prints of feature film Zindagi Zindabad (1997) and short films Bai (1985), Paani (1987), and Laha (1994). A 16 mm film Kishan ka Udan Khatola made by another veteran filmmaker and film society activist Vijaya Mulay is also part of the collection.

The major chunk of the collection feature cassettes of films, in different magnetic media formats like DigiBeta, Betacam, Umatic, DLT Tapes, DV, MiniDV, and VHS formats. The titles include duration wise six various versions of the short film Karta, a film based on the life of renowned Industrialist Shantanurao Kirloskar, feature films Zindagi Zindabad (1997), Devrai (2004), Ek Cup Chya (2009), and Mor Dekhne Jungle Mein (2010), short films Mukti (1990), Chakori (1992), Laha (1994), Zid (2004), Bewaqt Barish (2007), Mamta Ki Chhaon Mein, Ekalavya, Samvad and Sarashi, documentaries Parting with Pride, Gautam Chya Aaichi Shala and Pilgrims of light and TV show episodes of Katha Sarita (2011), Akherachi Ratra and Bhais Barabar. It also includes a series of short films on language education Natigoti, How shall I Address You and Adgula Madgula.

Expressing his gratitude towards NFAI Sunil Sukthankar said, “NFAI has been part of our filmmaking journey and I am glad that these films would now be preserved at its facility. I hope the material would be digitised so that it can be accessible to the new generation.”

Earlier in 2014-15, the filmmaker duo had deposited 35mm prints of some of their films and in 2018, on Sumitra Bhave’s 75th birthday, she donated original handwritten screenplays of ten of her films to NFAI.

“I am really happy that this major collection of the National Award-winning director duo would be preserved at NFAI. I had discussed this with Smt Sumitra Bhave last year but unfortunately, she passed away. Their filmography, covering many important subjects of the society, is a valuable social documentation of the era. I am sure that this will be a valuable source of learning for students, researchers and budding filmmakers,” said Prakash Magdum, Director, NFAI.

He further appealed to filmmakers and production houses to come forward and deposit celluloid films at NFAI.

Categories
National Film Archive of India

The information here is from the Press releases received from the National Film Archive of India (NFAI), an organisation directly under the Ministry of Information and Broadcasting (I&B).

No comment

Leave a reply

Log in using below social networks to join the discussion
Site Archives

Related by

  • The world’s largest film restoration project under the National Film Heritage Mission (NFHM) with a budget of INR 363 crores has been announced by the Ministry. Additional to this process, NFHM...
  • A substantial collection of home movies of renowned Manipuri dancer, Savita Ben Mehta is now part of the National Film Archive of India.  The collection is in 8mm and...
  • ” भारती यसिनेमाती लवेगवे गळ्या ‘प्रतिमांचावा परकरून दरवर्षी आगळ्यावेगळ्यादि नदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती कर ण्यातराष्ट्रीयचित्र पटसंग्रहालयने हमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपटसंग्र हालयाने यावर्षीही ( २०२२ ) अशाचएकावेगळ्या आणि आक र्षकदिनदर्शिके...
  • देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे ने एका विशेष आभासी प्रदर्शनाचे आयोजन केले...