In one of the major acquisitions, the National Film Archive of India acquired a treasure trove of Marathi cinema, and added 89 film prints in the 16mm and 35mm format to its collection. Most of the films acquired belong to the golden age of Marathi cinema from 1950s to 70s and there are some important Hindi films as well in the collection. With 23 black & white films, this is a significant acquisition of the old era of Indian cinema.
The highlight of the collection is two rare Marathi films Tai Teleen (1953) and Pavanakathcha Dhondi (1966) which were considered to be lost. ‘Tai Teleen’ is a historical film made by Aaryan Film Company starring well-known artists like Shanta Apte, Sudha Apte, Nalini Borkar and Zuzarrao Pawar. Directed by KP Bhave and Anto Narhari, the music was composed by Master Krishnarao.
Another major film considered to be lost till now, Anant Thakur’s ‘Pavanakathcha Dhondi’ had won as the Best Marathi Film in National Film Award in 1966, the 14th edition of the Award. Thakur had earlier directed Raj Kapoor starrer Chori Chori in 1956 and this was his first film as a director in Marathi. The film, produced by Usha Mangeshkar under Shri Mahalakshmi Chitra banner, starred renowned Marathi stars Jayashree Gadkar, Chandrakant and Suryakant in the leading roles. It was one of the rare instances where real-life brothers Chandrakant and Suryakant played brothers on-screen. As part of NFAI’s Aural History project, Suryakant had reminisced that it was an emotional moment for both of them to share screen space together as siblings. The film was based on the popular novel by writer G. N. Dandekar and the music of the film was composed by Hridaynatah Mangeshkar.
Another highlight of the collection is a Ram Gabale film Dev Pavala (1950). The film starring Damuanna Malavankar and Vishnupant Jog was shot in the iconic Prabhat Studio in Pune.
The other notable Marathi films are Rajan Kumar’s Bhaubejj (1955), Madhav Shinde’s Antaricha Deeva (1960), Datta Dharmadhikari’s Subhadraharan (1963), Vasant Painter’s Bara Varshe Saha Mahine Teen Divas (1967), Raj Dutt’s Dhakti Bahin (1970), Keshav Toro’s Pudhari (1972), Govind Kulkarni’s Banya Bapu (1977), Raja Bargir’s Deed Shahane (1979), Susheel Gajwani’s Rakhandar (1982), and Kanchan Nayak’s Kalat Nakalat (1989).
The collection also includes films by some key Marathi filmmakers such as Bhalji Pendharkar’s Sadhi Manse (1965), Raja Thakur’s Rajmanya Rajashri (1959), Ekti (1968) and Gharkul (1970), and Ramesh Deo’s Chhand Priticha (1968) and Jeeva Sakha (1991).
Along with the majority of Marathi films, the collection also consists few significant Hindi films such as Shakti Samanta’s black & white venture Naughty Boy (1962) with Kishore Kumar as the Hero, Mohan Kumar’s Aman (1967), which features rare cameo appearances by Ghazal maestro Jagjit Singh and British Nobel laureate Bertrand Russell. Other notable titles include Guest House (1959) by Ravindra Dave, Taj Mahal (1963) by M Sadiq, Shikari (1963) by Muhammed Hussain, Do Yaar (1972) by Kewal Mishra, and Uttam Kumar starrer Bandie (1978) directed by Alo Sarkar.
“We are delighted to receive this significant collection of films belonging to the golden era of Marathi Cinema and a few well-known Hindi films. The exciting thing is there are few rare films including Tai Telin (1953) and Pavanakathcha Dhondi (1966) which were believed to be lost but now they are part of NFAI. I take this opportunity to appeal film producers, distributors and individual collectors to come forward and submit films as well as film publicity material for preservation, with the purpose of safeguarding our cinematic heritage”, said Prakash Magdum, Director, NFAI.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील काही गाजलेल्या चित्रपटांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या समृद्धीत नव्याने भर पडली आहे. १९५० ते १९७० या दोन दशकाच्या काळातील प्राप्त झालेल्या एकूण ८९चित्रपटांमध्ये मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. या सर्व चित्रपटांच्या फिल्म्स १६एमएम ते ३५ एमएम स्वरूपातील आहेत. विशेषम्हणजे या खजिन्यात ‘ताई तेलीण’ ( १९५३ ), आणि ‘पवनाकाठचा धोंडी’ ( १९६६ ) या एकेकाळी ‘हरवल्या’ गेलेल्या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे. ‘ताईतेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आर्यन फिल्म कंपनीने केली होती आणि त्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे, सुधा आपटे, नलिनीबोरकर आणि झुजारराव पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. पी. भावे आणि अंतो नरहरी यांनी केले होते तर संगीत मास्टरकृष्णराव यांनी दिले होते.
‘ ताई तेलीण’ प्रमाणेच ‘हरवली’ म्हणून आतापर्यंत समज असलेली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाची फिल्मही मिळाली आहे. अनंत ठाकूर यांनीदिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला १९६६ साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला होता. अनंत ठाकूर यांनीच राजकपूर आणिनर्गिस या जोडीचा गाजलेला ‘चोरी चोरी’ हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला होता.’पवनाकाठचा धोंडी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच मराठी चित्रपटहोता. या चित्रपटाची निर्मिती ‘श्री महालक्ष्मी चित्र’ या बॅनरखाली गायिका उषा मंगेशकर यांनी केली होती. तर चित्रपटात चंद्रकांत, सूर्यकांत आणि जयश्रीगडकर यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. विशेष म्हणजे अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन सख्ख्या भावांनी या चित्रपटात सख्ख्या भावाचीच भूमिकाकेली होती हा एक दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या एका प्रकल्पातंर्गत भाग घेताना अभिनेते सूर्यकांत यांनी अतिशयभावनाशील होऊन या आठवणींना उजाळा देताना या दुर्मिळ योगायोगाचा उल्लेख केला होता. सुप्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या ‘पवनाकाठचाधोंडी’ याच कादंबरीवरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती आणि श्री हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या चित्रपटाला संगीत दिले होते.
या दुर्मिळ चित्रपटांच्या खजिन्यात राम गबाले यांच्या ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटाचाही समावेश आहे. दामूअण्णा मालवणकर आणि विष्णुपंतजोग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील प्रभात स्टुडिओत झाले होते. याशिवाय अन्य मराठी चित्रपटात रंजन कुमार यांचा’भाऊबीज’ ( १९५५ ), माधव शिंदे यांचा ‘अंतरीचा दिवा’ ( १९६० ), दत्ता धर्माधिकारी यांचा ‘सुभद्राहरण” ( १९६३ ), वसंत पेंटर यांचा ‘बारा वर्षे, सहा महिनेतीन दिवस, ( १९६७ ), राज दत्त यांचा ‘धाकटी बहीण” (१९७०), केशव तोरो यांचा ‘पुढारी’ (१९७२), गोविंद कुलकर्णी यांचा ‘ बन्याबापू ‘ ( १९७७ ), राजाबारगीर यांचा ‘दीड शहाणे’ (१९७९ ), सुशील गजवानी यांचा ‘राखणदार’ ( १९८२ ) आणि कांचन नायक यांचा ‘कळत-नकळत’ ( १९८९ ) आदींचा समावेशआहे. विशेष म्हणजे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा ‘साधी माणसं ‘ ( १९६५ ), राजा ठाकूर यांचा ‘राजमान्य राजश्री’ ( १९५९), राज दत्त यांचा ‘एकटी’ ( १९६८ ), ‘घरकुल’ ( १९७० ), रमेश देव यांचा ‘छंद प्रीतीचा’ ( १९६८ ) आणि ‘जिवा-सखा’ (१९९१) या गाजलेल्या यामध्ये चित्रपटांचाही समावेश आहे.
मराठीबरोबरच काही प्रमुख हिंदी चित्रपटांचाही या खजिन्यात समावेश आहे. शक्ती सामंत यांचा कृष्णधवल रंगातील ‘नॉटी बॉय’ ( १९६२ — नायककिशोर कुमार ), मोहन कुमार यांचा ‘अमन’ (१९६७ — नायक राजेंद्रकुमार ), ज्यामध्ये प्रसिद्ध ब्रिटिश तत्त्ववेत्ते बर्ट्रांड रसेल आणि गझल सम्राट जगजीत सिंगयांचे दुर्मिळ दर्शन घडलेले आहे. तसेच अन्य प्रमुख हिंदी चित्रपटांमध्ये रवींद्र दवे यांचा ‘गेस्ट हाऊस’ ( १९५९), एम. सादिक यांचा ‘ताजमहाल’ (१९६३), मोहम्मद हुसेन यांचा ‘शिकारी’ ( १९६३), केवल मिश्रा यांचा ‘दो यार’ ( १९७२) आणि अलो सरकार दिग्दर्शित आणि उत्तमकुमार अभिनित ‘बंदी’ (१९७८) आदी चित्रपटांचा समावेश आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील काही गाजलेल्या चित्रपटांचा तसेच काही दुर्मिळ हिंदी चित्रपटांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडेप्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले की, ‘ ताई तेलीण’ प्रमाणेच ‘हरवली’ म्हणूनआतापर्यंत समज असलेली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाची फिल्मही राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त झाल्यामुळे त्याचा दुहेरी आनंद होत आहे.संबंधित चित्रपट निर्माते, वितरक, वैयक्तिक संग्राहक यांनी आपल्याकडील दुर्मिळ फिल्म्स.तसेच चित्रपटविषयक साहित्य आणि अन्य माहिती जतन करूनठेवण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले आहे.