Treasure of oral history now in public domain

Oral history project

A rich treasure of oral history is now in the public domain. On the occasion of the 151st birth anniversary of the father of Indian cinema, Dadasaheb Phalke, the National Film Archive of India (NFAI) has published about 8000 minutes of interviews of veteran film artists from the Indian film industry on its website. Starting from the silent era of Indian cinema, these are the fascinating tales of journeys of actors, technicians, producers, directors and studio owners. Conducted mostly in the 1980s, these interviews were recorded as part of the Oral History Project of NFAI’s Research Programme and features long interviews of pioneering film personalities, narrating the experiences about their life, stories and anecdotes from the world of cinema.

“We are delighted to make available this vast treasure of audio recordings which constitutes a rich reference material for anyone who is interested in studying Indian cinema. One of the main objectives of NFAI is to disseminate knowledge about Indian cinema and I am glad that these voices from the past can now be heard across the world,” said Prakash Magdum, Director NFAI.

There are 53 interviews with the audio recording of about 8000 minutes duration of film artists conducted in five languages- Marathi, Tamil, Telugu, English and Bengali. The artists include Who’s Who of the Indian film industry including J. B. H. Wadia, Akkineni Nageshwar Rao, Vijay Bhatt, P Bhanumathi, SD Subbulakshmi, MK Radha, P Leela, C Honnappa Bhagvathar, Zunzarrao Pawar, Dada Salvi, Chandrakant Gokhale, RM Krishnaswamy, SV Venkatraman, R Ramamurthy, KS Prakash, V Gopalakrishnan, R B Lakshmidevi, Shahu Modak, E Mohammed, V V Bapat, Vivek, Vishnupant Jog, Nanasaheb Sathe, Ganpatrao Bondre, Nilu Phule, Sharad Talwalkar, Shobha Sen, Surykant Mandhare, Chittaranjan Kolhatkar and Soumitra Chatterjee apart from others. The longest interview in the series is of veteran Bengali actor Soumitra Chatterjee taken by Anasua Roy Chaudhary with a duration of 584 minutes. These long interviews not only throw light on the personal journey of these artists but also give an in-depth account of the changes in the Indian film industry over a long period of time.

One of the major highlights of the Oral History Project of NFAI is the interviews of several old associates of D.G.Phalke who closely worked with the father of Indian cinema. These artists, coming from diverse backgrounds, entered the film industry at its nascent stage and went on to do bit roles in Phalke’s Hindustan Cinema Film Company. India’s first child artist and Dadasaheb Phalke‘s daughter Mandakini Phalke nee Athavale is extensively interviewed where she speaks about working as child Krishna in Kaliya Mardan (1919). Several of these silent era artists including Ganpatrao Tambat, Sahdevrao Tapkire, Baburao Patil, Narayan Tambat, Haribhau Lonare, and Vasant Shinde worked in Phalke’s studio in various capacities. They share their intimate experiences of working with Phalke in the process throwing light on the humane side of Phalke as well as his craft of film making.

The Oral History Project of NFAI was started back in 1983, where the interviews were recorded on audio cassettes only. Later, with the shift in technology, this project was converted into the Audio-Visual History Project in 2008, where a film/video was recorded interspersed with clippings from related films and other visual material like photos, posters, etc. to illustrate the interview.

These interviews were conducted by Scholars as a part of this project in the 80s and 90s at the artist’s house. Bapu Watve, one of the artists from Prabhat Film Company and film historian took most of these interviews in Marathi. Another renowned film historian and writer Randor Guy conducted many in-depth interviews in Tamil, Telugu and English. There are 26 interviews in Marathi, 10 in Tamil, 12 in English, 3 in Telugu and 2 in the Bengali language.

One can click on https://nfai.gov.in/audio_interview.php to listen to these recordings. While the audio plays, the English translation of the interviews are made available on the side. Wherever possible, the relevant photographs of the artists and posters of the film they worked in are also added.

“As most of the interviews are four decades old, we decided to digitize them. We also took the help of the Sound Dept of FTII to enhance the voice quality of the interviews,” said Prakash Magdum. He added, “Since most of these interviews are in various Indian languages, they were translated into English so that film lovers across the world who are interested in Indian cinema can take benefit of it. We believe that when the 150th birth anniversary celebrations of Dadasaheb Phalke are coming to an end today, making this rich database available to film lovers would surely be a befitting tribute to the father of Indian cinema.”

 


 

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५१ व्या जयंतीचे निमित्त साधून पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने  भारतीय चित्रपटसृष्टीच्या मौखिक इतिहासाचा फार मोठा खजिना चित्रपट रसिकांसाठी खुला केला आहे.  भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंतांच्या प्रत्यक्ष मुलाखतींवर आधारित सुमारे आठ हजार मिनिटांचा मौखिक इतिहास राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध  करून देण्यात आला आहे. मूकपटाच्या जमान्यापासून ते अलीकडील काळापर्यंत चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर अभिनेते, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, स्टुडिओ-मालक यांच्या अद्भुतरम्य प्रवासाचा इतिहास याद्वारे ऐकायला  मिळणार आहे. मौखिक इतिहास प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संशोधन कार्यक्रमानुसार प्रामुख्याने १९८० मध्ये या मान्यवर कलावंतांच्या मुलाखती ध्वनिमुद्रित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या जीवनात आलेले विविध अनुभव, अनेक अकल्पित घटना आणि  चित्रपट-जगतातील रोमहर्षक प्रसंग आदींचे वर्णन आहे.

”  भारतीय चित्रपटसृष्टीच्या अभ्यासामध्ये रुची असणाऱ्या अनेकांसाठी हा ध्वनिमुद्रित मुलाखतींवर आधारित मौलिक संदर्भ असलेला अद्भुत माहितीचा खजिना उपलब्ध करून दिल्याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे  असे सांगताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे  संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की,  भारतीय चित्रपटसृष्टीविषयी सर्वांगीण माहिती उपलब्ध करून देणे हे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे  उद्दिष्ट आहे आणि या निमित्ताने भारतीय  चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंताचे आवाज जगभर ऐकले जातील ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट ठरणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सुमारे आठ हजार मिनिटांच्या या ध्वनिचित्र फितीमध्ये एकूण ५३ कलावंतांच्या मुलाखती असून त्या मराठी, तमिळ, तेलगू, बंगाली आणि इंग्लिश या पाच भाषांमधून घेण्यात आल्या आहेत. आणि त्या मान्यवर कलावंतांमध्ये जे.बी.एच. वाडिया, अक्कीनेनी नागेश्वरराव, विजय भट्ट, पी. भानुमती, एस. डी. सुब्बुलक्ष्मी, एमके राधा, पी. लीला, सी. होनप्पा भागवतार, झुंजारराव पवार, दादा साळवी, चंद्रकांत गोखले, आर एम कृष्णस्वामी, एस. व्ही. वेंकटरमण, आर. राममूर्ती, के. एस. प्रकाश, व्ही. गोपालकृष्णन, आर.बी. लक्ष्मीदेवी, शाहू मोडक, इ. मोहम्मद, वि. वि. बापट, विवेक, विष्णुपंत जोग, नानासाहेब साठे, गणपतराव बोन्द्रे, निळू फुले, शरद तळवलकर, शोभा सेन, सूर्यकांत मांडरे, चित्तरंजन कोल्हटकर, सौमित्र चॅटर्जी आदींचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त मोठी म्हणजे ५८४ मिनिटांची मुलाखत सौमित्र चॅटर्जी यांची आहे. त्यांची ही मुलाखत अनसूया रॉय चौधरी यांनी घेतली आहे.  कलावंतांच्या या दीर्घ मुलाखती केवळ त्यांच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाशझोत टाकीत नाहीत तर भारतीय चित्रपटसृष्टीत काळानुसार कसे महत्वाचे बदल घडत गेले त्याचेही दर्शन घडवितात.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या घेतलेल्या मुलाखती हे  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या या मौखिक इतिहास प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला ज्यांना ‘सिनेमा’ म्हणजे काय हे देखील माहित नव्हते मात्र नंतर ज्यांनी चित्रपटसृष्टीला महत्वाचे योगदान दिले अशा, दादासाहेब फाळके यांच्या हिंदुस्थान फिल्म कंपनीतील अनेक कलाकारांचा त्यामध्ये समावेश आहे. भारताची पहिली बालकलाकार म्हणून नावाजलेली दादासाहेब फाळके यांची कन्या मंदाकिनी फाळके-आठवले यांनी आपल्या मुलाखतीमध्ये ‘कालिया मर्दन’ ( १९१९ ) या मूकपटात  बाल कृष्णाचे काम कशा पद्धतीने केले त्या आठवणींना उजाळा दिला आहे. याशिवाय मूकपटाच्या जमान्यात फाळके यांच्या स्टुडिओत वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सांभाळणारे, गणपतराव तांबट, सहदेवराव तापकीरे, बाबुराव पाटील, नारायण तांबट, हरिभाऊ लोणारे, वसंत शिंदे यांनी आपल्या मुलाखतींमध्ये दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटविषयक कामकाजासंबंधी तसेच त्यांच्या ‘माणूस’ पणासंबंधीचे मनोज्ञ दर्शन घडविले आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या मौखिक इतिहास प्रकल्पाचे काम १९८३ मध्ये सुरु झाले. त्यामुळे सुरुवातीला ध्वनिफितीच्या साहाय्याने कलावंतांच्या या मुलाखती घेण्यात आल्या मात्र नंतर तंत्रज्ञान बदलत गेले. त्यानुसार २००८ मध्ये या प्रकल्पाचे रूपांतर ‘ध्वनी-चित्र फितीत’ करण्यात आले. त्यानुसार कलावंतांच्या या मुलाखतींमध्ये संबंधित चित्रपटांचे फोटो, पोस्टर्स, तसेच चित्रपटांच्या क्लिपिंग्स टाकून या मुलाखती अधिक माहितीपूर्ण आणि विस्तृत करण्यात आल्या. १९८० ते १९९० या काळात चित्रपट अभ्यासकांनी संबंधित कलावंतांच्या घरी जाऊन या मुलाखती घेतल्या आहेत. प्रभात फिल्म कंपनीतील एक  कलाकार आणि ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक बापू वाटवे यांनी प्रामुख्याने मराठीतील  मुलाखती घेतल्या आहेत. प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आणि लेखक रॅन्डॉर गाय यांनी तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये मुलाखती घेतल्या आहेत. मराठीमध्ये एकूण २६ मुलाखती असून तमिळमध्ये १०, इंग्रजीमध्ये १२, तेलगूमध्ये ३ तर बंगाली भाषेत २ मुलाखती आहेत.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या https://nfai.gov.in/audio_interview.php या संकेतस्थळावर कोणीही गेल्यास त्यांना या मुलाखती ऐकता येतील. मुलाखती चालू असतानाच एका बाजूला त्याचे इंग्रजी भाषांतरही दिसेल. तसेच जेथे जेथे शक्य असेल तेथे त्या त्या कलावंतांची छायाचित्रे आणि संबधित चित्रपटांचे  पोस्टर्स आणि  इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

” यातील बहुतांश मुलाखती या चार दशकांपूर्वीच्या आहेत त्यामुळे त्या डिजीटाईझ करण्याचा आम्ही निर्णय घेतला. तसेच फिल्म इन्स्टिट्यूटमधील ध्वनी विभागाच्या मदतीने या मुलाखतींमधील आवाजांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न आम्ही केला  असे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम यांनी यावेळी सांगितले. तसेच यातील बहुतांश  मुलाखती वेगवेगळ्या भारतीय भाषांमधून घेण्यात आल्या आहेत त्यामुळे त्या सर्वांचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले आहे  जेणेकरून भारतीय चित्रपटसृष्टीविषयी आस्था असणाऱ्या जगभरातील चित्रपट अभ्यासकांना त्याचा लाभ घेता येईल अशीही माहिती मगदूम यांनी दिली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५० व्या जयंती सोहळ्याची आज सांगता होत असतानाच भारतीय चित्रपटसृष्टीच्या  मौखिक इतिहासाचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध होत असल्याची घटना म्हणजे एका परीने फाळके यांना सर्वोच्च आदराजंली अर्पण करण्यासारखेच आहे असेही श्री मगदूम म्हणाले.

oral history

Categories
National Film Archive of India

The information here is from the Press releases received from the National Film Archive of India (NFAI), an organisation directly under the Ministry of Information and Broadcasting (I&B).

No comment
Site Archives

Related by

  • The world’s largest film restoration project under the National Film Heritage Mission (NFHM) with a budget of INR 363 crores has been announced by the Ministry. Additional to this process, NFHM...
  • Precious collection of films by Sumitra Bhave and Sunil Sukhthankar now with NFAI   मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि  सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांचा अनमोल खजिना राष्ट्रीय चित्रपट...
  • A substantial collection of home movies of renowned Manipuri dancer, Savita Ben Mehta is now part of the National Film Archive of India.  The collection is in 8mm and...
  • ” भारती यसिनेमाती लवेगवे गळ्या ‘प्रतिमांचावा परकरून दरवर्षी आगळ्यावेगळ्यादि नदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती कर ण्यातराष्ट्रीयचित्र पटसंग्रहालयने हमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपटसंग्र हालयाने यावर्षीही ( २०२२ ) अशाचएकावेगळ्या आणि आक र्षकदिनदर्शिके...