NFAI acquires rare footage from MCCIA

MCCIA hands over footage to NFAI

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर कडून एक दुर्मिळ 16 एमएम फुटेज मिळाले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या या  सुमारे 1200 फूट लांबीच्या फुटेजचा कालावधी 35 मिनिटआहे. यामध्ये एमसीसीआयए. च्या संस्थात्मक इतिहासामधील 1940 ते 1960 च्या काळातील प्रमुख घटनांचा समावेश आहे. प्रामुख्याने ब्लॅक अँड व्हाइट या फुटेजचा  काही भाग रंगीत आहे. MCCIA

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर चे महासंचालक श्री. प्रशांत गिरबाने यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम यांच्याकडे आज ही दुर्मिळ रीळ सुपूर्द केली.

१९५९ साली झालेल्या रौप्य महोत्सवी समारंभाची दृश्ये या फुटेजची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्याच बरोबर पुण्याच्या टिळक रोड येथील एमसीसीआयएच्या इमारतीचे उद्घाटन, एमसीसीआयएची मासिक पत्रिका संपदा (जे १९४७ मध्ये सुरू झाले होते), “परिषद आणि चर्चा – सभा” ज्यात श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांचा गौरव समारंभ ही साजरा झाला  अशा अनेक महत्वाच्या कार्यक्रमांमधील क्लिप्स आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दिग्गज स्वातंत्र्य सेनानी सी. राजगोपालाचारी हेही एमसीसीआयएमधील एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र आणि पुणे विभाग उत्पादकता परिषद यासारख्या नामांकित संस्थांचे फुटेज ही यामध्ये आहे. एकंदरीत पुण्यातील  औद्योगिक विकासाचा आणि त्यासाठी एमसीसीआयएच्या प्रयत्नांचा इतिहास ह्या फुटेजेस मध्ये आहे.

यावेळी श्री. प्रशांत गिरबाने म्हणाले , “आम्हाला हे महत्वाचे फुटेज आमच्याच कार्यालयात सापडले आणि आज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला ते जतनासाठी सुपूर्द केले आहे. आम्ही हे महत्त्वपूर्ण फुटेज डिजिटल करण्याचीही विनंती केली आहे.”

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले, “मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर कडून हे दुर्मीळ फुटेज मिळवताना आम्हाला आनंद झाला आहे. हे फूटेज चांगल्या स्थितीत आहे आणि आम्ही त्याचे डिजिटायझेशन करण्यासाठी प्रयत्न करू. पुणे शहराच्या पायाभूत सुविधांची व औद्योगिक विकासाची प्रगती दर्शविणारे हे अतिशय संग्रही मूल्याचे फुटेज आहे.”

श्री. मगदूम यांनी एमसीसीआयएला यावेळी विनंती केली की शहरातील जुन्या औद्योगिक संस्थांपर्यंत पोचून अशी दुर्मिळ फुटेज व चित्रपट जतन करण्यासाठी मिळावेत यासाठी मदत करावी.

 

National Film Archive of India has acquired a rare 16 mm footage from the city based industry body, Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture (MCCIA).

In a close event today, Mr Prashant Girbane, Director General, MCCIA handed over the reel to Mr Prakash Magdum, Director NFAI.  The rare footage is about 1200ft with a duration of 35 minutes having historically value. It chronicles major events in MCCIA’s organizational history from the late 1940s to 1960s. Predominantly Black & White, the footage also features some parts in colour.

The major highlights of the footage are snippets from the events such as the Silver Jubilee Ceremony, the inauguration of MCCIA’s building at Tilak Road in Pune, MCCIA’s monthly magazine Sampada (which started back in 1947), “Parishada ani Charcha – Sabha” with Felicitation of Mr Shantanurao Kirloskar, and several other excerpts from varied events. Importantly, veteran freedom fighter and leader C. Rajagopalachari is also seen participating in one of the function at MCCIA. Adding the importance of the footage it also covers prominent institutes like Bank of Maharashtra and Pune Division Productivity Council and follows the industrial development in Pune Area and MCCIA’s efforts in same.

While handing over the film, Mr Girbane said, “We discovered this footage recently in our premises and thought it fit to hand over to NFAI. We have requested NFAI to digitise this important footage.”

NFAI Director Mr Prakash Magdum said, “We are delighted to receive this rare footage from Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture [MCCIA]. The initial inspection suggests that the footage is in good condition and we will take efforts to digitise the same. It is footage of immense archival value as it depicts the growth of  infrastructural and industrial growth of the city over the years.”  Shri Magdum requested MCCIA to facilitate in reaching out to old industrial organizations in the city for getting such rare footages and films.

Categories
National Film Archive of India

The information here is from the Press releases received from the National Film Archive of India (NFAI), an organisation directly under the Ministry of Information and Broadcasting (I&B).

No comment
Site Archives

Related by

  • ” भारतीयसिनेमातीलवेगवेगळ्या ‘प्रतिमांचावापरकरूनदरवर्षीआगळ्यावेगळ्यादिनदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मितीकरण्यातराष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयनेहमीचअग्रेसरअसते. राष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयानेयावर्षीही( २०२२ ) अशाचएकावेगळ्याआणिआकर्षकदिनदर्शिकेचीत्यामध्येभरघातलीआहे. गेल्यावर्षीप्रमाणेयावर्षीहीडिजिटलपद्धतीनेदिनदर्शिकातयारकरण्यात आली असूनचित्रपटरसिकांना अतिशयआवडूशकेल अशीहीआकर्षक दिनदर्शिकाराष्ट्रीयचित्रपटसंग्रहालयाच्या अधिकृतसंकेतस्थळावरउपलब्ध करूनदेण्यातआलेलीआहे. – https://www.nfai.gov.in/ भारतीयस्वातंत्र्ययुद्धाच्याकाळातजुलमीब्रिटिशसत्तेविरूद्धहजारोमहिला आणिपुरुषांनीनिर्भयपणेलढादे ऊनआपल्यामातृभूमीसाठीबलिदानकेले. भारतीयस्वातंत्र्याचेयंदाचेहे अमृतमहोत्सवीवर्षआहे. त्यानिमित्त ” यादकरोकुर्बानी ” यासंकल्पनेच्याआधारावरहीदिनदर्शिकातयारकरण्यातआलीअसूनत्यामध्येमोठ्यापडद्यावरीलस्वातंत्र्याचीगाथासमाविष्टकरण्यातआलीआहे. ...
  • देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे ने एका विशेष आभासी प्रदर्शनाचे आयोजन केले...
  • राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या चित्रपट खजिन्यात एक मोलाची भर पडली आहे. 450 पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स या खजिन्यात सामावल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील या चित्रफिती असून ह्या दुर्मिळ स्लाइड्स...
  • NFAI is delighted to announce a significant addition of the original camera negative of Rajkumar Hirani’s film PK in its collection. Hirani is one of the major contemporary Indian...