Rajkumar Hirani’s PK now in NFAI Collection

PK now in NFAI archive

NFAI is delighted to announce a significant addition of the original camera negative of Rajkumar Hirani’s film PK in its collection. Hirani is one of the major contemporary Indian filmmaker who has carved a niche for himself through his distinct filmography over the years. Rajkumar Hirani today handed over the original camera negative of his 2014 film PK to Prakash Magdum, Director NFAI in Mumbai.

Written, edited and directed by Rajkumar Hirani, PK is a wonderful political satire on Indian society. Co-produced by Hirani along with Vidhu Vinod Chopra, PK, also happens to be one of the last few films to be shot on celluloid in India.

Rajkumar Hirani said on the occasion, “It was important to preserve the negative and I am very happy that it would be preserved in NFAI at Pune. It is the duty of a filmmaker to ensure that the films are preserved and I appeal to all filmmakers to support NFAI in this important cause”.

The original Negatives of Rajkumar Hirani‘s earlier films like Munnabhai MBBS (2003), Lage Raho Munnabhai (2006) and 3 Idiots (2009) are already being preserved at NFAI.

Hirani, an alumni of FTII, is known for his lighthearted take on tackling social issues through his films and provide a new perspective on contemporary issues.

Commenting on superstition, PK (2014) with the quirky titular character of an alien tries to make sense of the world around, in an eccentric but endearing way. Apart from the original camera negative, about 300 cans consisting of rushes of PK and outtakes of 3 Idiots film were also handed over for preservation. A huge paper material consisting of posters, lobby cards and photographs of films directed by Hirani would also be handed over to NFAI.

Prakash Magdum, Director NFAI said, “we are happy to continue our association with Mr Hirani as his earlier acclaimed films are also being preserved at NFAI. It is wonderful to add PK in our collection , especially because it was shot on celluloid.” The transition from celluloid to digital in terms of production of films in India happened during 2013-14. Therefore, it is all the more important to have this film for preservation, Magdum added.

 


 

राजकुमार हिरानी यांच्या गाजलेल्या ‘पीके’ या हिंदी चित्रपटाच्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्ज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळेसाहजिकच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे दालन आणखी समृद्ध झाले आहे. राजकुमार हिरानी यांचे गेल्या काही वर्षातील भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचेआहे. स्वता; राजकुमार हिरानी यांनी आज ( मंगळवारी) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम यांच्याकडे २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’  चित्रपटाच्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्ज सुपूर्द केल्या.

राजकुमार हिरानी यांनीच लेखन, संपादन आणि दिग्दर्शन केलेला ‘पीके’ चित्रपट म्हणजे भारतीय समाजातील राजकीय प्रहसनाचा उत्तम नमुना आहे. याशिवायविधू विनोद चोप्रा यांच्याबरोबर सहनिर्मिती केलेल्या ‘पीके’ चित्रपट  हा  सेल्युलॉइड मध्ये चित्रित केलेल्या भारतातील शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक प्रमुखचित्रपट आहे.

राजकुमार हिरानी यावेळी म्हणाले, “निगेटिव्ह्ज टिकवणे महत्त्वाचे आहे आणि ते पुण्यात एनएफएआयमध्ये जतन केले जातील याबद्दल मला फार आनंद होतआहे. चित्रपट जपले पाहिजेत हे सुनिश्चित करणे हे एक निर्मात्याचे कर्तव्य आहे आणि मी सर्व चित्रपट निर्मात्यांना या महत्त्वपूर्ण कारणासाठी राष्ट्रीय चित्रपटसंग्रहालयाला समर्थन करण्याचे आवाहन करतो. ”

राजकुमार हिरानी यांच्याच यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (२००३), ‘लगे रहो मुन्नाभाई’ (२००६), आणि ‘थ्री इडियट्स’ (२००९) यातिन्ही चित्रपटांचे जतन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने यापूर्वीच केले आहे.

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असलेले राजकुमार हिरानी आपल्या चित्रपटांद्वारे हलक्या फुलक्या पद्धतीने सामाजिक विषयांची मांडणी करण्यासाठीप्रसिद्ध आहेत. ‘पीके’ चित्रपटातील पृथ्वीवर अवतरलेल्या  परग्रहवासीचे  विक्षिप्त ‘व्यक्तिमत्व’ जगात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा कसा ‘वेध’ घेते हे त्याचित्रपटात हिरानी यांनी मोठ्या कल्पकतेने विशद केले आहे.

‘पीके’ च्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्ज बरोबरच  सुमारे ३०० कैन्स एवढ्या या चित्रपटाच्या रशेस आणि ३ इडियट्स चित्रपटाच्या आउटटेक्स संरक्षणासाठी सोपविण्यात आल्या. पोस्टर, लॉबी कार्ड आणि हिरानी दिग्दर्शित चित्रपटांचे छायाचित्र असलेले मोठे पेपर मटेरियल सुद्धा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

याप्रसंगी राजकुमार हिरानी यांचे सहर्ष स्वागत करताना  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले की,  “राजकुमार हिरानी आणिराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा ‘स्नेह’  वृद्धिंगत राहील असाच आमचा प्रयत्न आहे. यापूर्वीही राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने त्यांचे काही चित्रपट जतन करून ठेवलेआहेत. ‘पीके’ चित्रपट जतन करण्याची आम्हाला संधी मिळाली याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे कारण तो सेल्युलॉइड मध्ये चित्रित करण्यात आला आहे.”भारतात चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात २०१३ ते  २०१४ या काळात  ‘सेल्युलॉइड’ ते ‘डिजिटल’ असे स्थित्यंतर घडले त्यामुळे ‘पीके’ सारखा चित्रपट जतन करणेआमच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे असेही श्री मगदूम यांनी यावेळी सांगितले.

 

Categories
National Film Archive of India

The information here is from the Press releases received from the National Film Archive of India (NFAI), an organisation directly under the Ministry of Information and Broadcasting (I&B).

No comment
Site Archives

Related by

  • देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे ने एका विशेष आभासी प्रदर्शनाचे आयोजन केले...
  • राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या चित्रपट खजिन्यात एक मोलाची भर पडली आहे. 450 पेक्षा अधिक काचेच्या स्लाइड्स या खजिन्यात सामावल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील या चित्रफिती असून ह्या दुर्मिळ स्लाइड्स...
  • A rich treasure of oral history is now in the public domain. On the occasion of the 151st birth anniversary of the father of Indian cinema, Dadasaheb Phalke, the...
  • A rare short film made on Dr. Babasaheb Ambedkar in 1968 has been acquired by National Film Archive of India. The film in Marathi titled ‘Mahapurush Dr. Ambedkar’ was...